कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’चा समाजातील जिज्ञासूंप्रमाणे साधकांनाही या उपक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.
१. अल्प अनुभवात गुरुकृपेनेच सेवांचे नियोजन होणे
‘साधना सत्संग’ ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेण्याची सर्वच साधकांची पहिली वेळ होती. ‘ऑनलाईन’ स्वरूपात सत्संग घ्यायचा, तर विषय प्रभावी होण्यासाठी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ (PPT- टीप) आवश्यक होते. विषय निवडणे, पी.पीटी. बनवणे, भाषांतर करणे, अशा सेवांचे नियोजन करणे आवश्यक होते. साधकांना या सेवांचा विशेष अनुभव नसतांना अल्प कालावधीत गुरुकृपेनेच सर्व सेवांचे नियोजन झाले.
टीप – हे सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
२. दळणवळण बंदीकाळात युवा साधकांना सेवा मिळाल्या.
३. ‘देवच सेवा करवून घेतो’, अशी अनुभूती येणे
सत्संगाच्या संहितेचे लिखाण करणारे, पीपीटी बनवणारे, अभ्यासवर्गाच्या माध्यमातून सत्संग सेवकांची सिद्धता करवून घेणारे, भाषांतर करणारे साधक गुरुकृपेनेच गेली ३ वर्षे नियमित सेवा करत आहेत. ‘देवच सेवा करवून घेतो’, अशी अनुभूतीही घेत आहेत.
४. ‘ईश्वराला काहीही अशक्य नाही’, याची अनुभूती घेणे
सत्संग घेणारे अनेक साधक भ्रमणभाषवर सत्संग घेण्यासाठी सक्षम नव्हते; पण अन्य साधकांच्या साहाय्याने भ्रमणभाष वापरायला शिकण्यापासून सत्संगासाठी इच्छुकांना त्यांच्या भ्रमणभाष संचामध्ये ‘ॲप्लीकेशन’ (भ्रमणभाषमधील सुविधा) चालू करायला आणि वापरायला शिकवणे, या सेवा साधकानी श्रद्धेने केल्या. ईश्वराला काहीही अशक्य नाही, याची अनुभूती घेतली.
५. व्यावसायिक प्रशिक्षण नसतांना सेवा शिकणे
काही मासांतच साधकांनी सत्संग घेण्यासह पीपीटी दाखवणे, ‘चॅटबॉक्स’मधील (संकेतस्थळावर येणार्या अभिप्रायांचे ठिकाण) प्रश्नांना उत्तरे देणे, या सेवा केल्या. व्यावसायिक प्रशिक्षण नसतांना साधक गुरुकृपेने सेवा शिकून अष्टावधानी होत आहेत.
६. उच्चशिक्षण नसतांनाही तांत्रिक अडचणींवर मात करणे
सत्संग घेणार्यांपैकी अनेक जण गृहिणी आहेत. तरीही तांत्रिक अडचणींवर मात करून, अनोळखी लोकांना साधना सांगण्यासाठी संपर्क करणे, साधना शिकवणे, भ्रमणभाषवर संवाद साधून समोरच्या व्यक्तींची प्रकृती जाणून घेणे, त्यांना आध्यात्मिक स्तरावर आधार देऊन साधनेस प्रोत्साहन देणे, हे केवळ गुरुकृपेनेच त्यांना साध्य होते.
७. आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होत आहेत, शिकण्यातील आनंद मिळत आहे, हे साधकांनी अनुभवणे
समाजाला साधनेविषयी सांगतांना स्वतःच्या साधनेला दिशा मिळाली. अध्यात्मविषयक ज्ञान वाचतो, तेव्हा आपल्याला साधनेच्या पुढील टप्प्याचे शिकायला मिळते, हे साधकांनी अनुभवले. विषयाचे मनन चिंतन करताना स्वतःचे आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होऊन शिकण्यातील आनंद मिळाला. स्वतःच्या साधनेला गती मिळत असल्याचे अनुभवता आले.
८. अल्प वेळेत अनेक जिवांना साधनेचा समृद्ध मार्ग दाखवण्याच्या सेवेतील आनंद मिळणे
अनेक साधक नोकरी, व्यवसाय, संसार आदी सांभाळून सेवा करतात. ‘ऑनलाईन’ सत्संग केवळ भ्रमणभाष आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून घेऊ शकत असल्याने घरबसल्या अल्प कालावधीत साधक सत्संग घेण्याची सेवा करू शकतात.
९. साधकांची अंतर्मुखता वाढणे
साधकांना देवाने अंतर्मुख केले. सत्संगाच्या माध्यमातून गुरुदेवांनी ग्रंथरूपातील विपुल ज्ञानगंगेच्या प्रवाहात आल्याने साधनेविषयी अंतर्मुखता वाढल्याचे आणि खर्या अर्थाने साधनेला प्रारंभ झाल्याचे अनेक साधकांनी अनुभवले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |