परशुरामभूमीत अमृत सोहळा !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव हा संपूर्ण कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर पार पडला.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सनातन संस्था !

सावरकर यांनी संपूर्ण हिंदु समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न सनातन संस्था सातत्याने करत आहे. त्यासाठी सनातन संस्था ही हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभाग घेते…

सर्वस्वाचा त्याग करणारी आणि नामानिराळे रहाणारी अद्वितीय सनातन संस्था !

शिरा खातांना आपल्याला रवा, काजू, बदाम, वेलची, बेदाणे दिसतात; पण ज्यामुळे तो गोड झाला आहे, ती साखर कुठेच दिसत नाही. असे असले, तरी ती साखर शिर्‍यासाठी आवश्यक आहे. ती सर्वस्वाचा त्याग करते. त्याचप्रमाणे समाजामध्ये निरनिराळी राष्ट्रासाठी कामे चालू असलेली दिसतात; पण त्यामागे असलेली सनातन संस्था दिसत नाही. 

सनातन संस्था

या वर्षी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेसाठी हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातन संस्था म्हणजे काय ?’ आणि ‘तिचे कार्य काय ?’, हे कळण्यासाठी सनातनच्या संस्थेच्या आध्यात्मिक कार्याची वाटचाल येथे देत आहे. 

सनातन संस्थेची २५ वर्षे आणि समाज !

सनातन संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थेचा रोख व्यक्ती घडवण्याकडे आहे. आपला देश, समाज यांना योग्य दिशा देत संस्थेचा संदेश अखिल मानव जातीपर्यंत पोचवणे, त्या अनुषंगाने संपूर्ण मानव जातीचा उद्धार करणे, हे संस्थेचे गेल्या २५ वर्षांपासूनचे स्वप्न आहे…

सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ह्यांच्या उत्तुंग कर्तृत्त्वाची रजतजयंती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ह्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून गेल्या काही वर्षांत अनेकानेक उपक्रम हाती घेतले. त्या असीमित कार्यातील काही उपक्रम पुढे देत आहोत..

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !

सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट : एक अविस्मरणीय अनुभव !

क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही ! 

सनातन सांगत असलेल्या साधनेची फलनिष्पत्ती !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सनातन संस्थेच्या व्यापक अध्यात्मप्रसाराच्या (धर्मप्रसाराच्या) कार्यात योगदान देऊन धर्मसेवा करा !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करा आणि कुटुंबाला आनंदी बनवा !