सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची यागाला वंदनीय उपस्थिती !

जुज्जूरु (आंध्रप्रदेश) – येथील जुज्जूरु हे यज्ञदत्तात्रेय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. २१ मार्च ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये येथे ‘ज्योतिष्ठोम अग्निष्टोम याग’ पार पडला. ‘कलुषित झालेली भूमी, जल, वायू, आकाश आणि निसर्ग वेदमंत्रांसहित केलेल्या यज्ञकर्मामुळे शुद्ध होऊ दे’, हा या यज्ञाचा उद्देश आहे. हा यज्ञ केल्याने मद्दुरी वेंकट माधव शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. बालात्रिपुरसुंदरी यांना ‘सोमयाजी’ आणि ‘सोमपिथीनी’, असे पद प्राप्त होणार आहे.
मद्दुरी वेंकट माधव शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. बालात्रिपुरसुंदरी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. त्याप्रमाणे २ एप्रिल या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या यागाला उपस्थित होत्या. या वेळी उपस्थित ब्रह्मवृंदाने त्यांना वेदमंत्रयुक्त आशीर्वाद दिला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी यागाचे यजमान मद्दुरी वेंकट माधव शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. बालात्रिपुरसुंदरी यांचा यथोचित सन्मान केला. याप्रसंगी यज्ञाचे गुरु, मुख्य आचार्य आणि मद्दुरी माधव शर्मा यांचे वडील मद्दुरी अंजनेय सोमयाजी यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी यजमान मद्दुरी वेंकट माधव शर्मा यांना १७ ते १९ मे या कालावधीमध्ये गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला येण्याचे निमंत्रण दिले.
मद्दुरी माधव शर्मा यांचा परिचय
मद्दुरी वेंकट माधव शर्मा हे जुज्जूरु, आंध्रप्रदेश या गावचे आहेत. त्यांच्या ४ पिढ्यांपासून ‘अग्निहोत्री’ ही परंपरा चालू आहे. मद्दुरी वेंकट माधव शर्मा यांनी तिरुपति येथील पद्मावतीदेवीच्या मंदिरात गेली ३५ वर्षे वेदमंत्रपठणाची सेवा केली आहे. मद्दुरी वेंकट शर्मा हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी पद्मावतीदेवीच्या गाभार्यात बसून मंत्रपठण करत असतात. |