‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना तातडीच्या वापरासाठी संमती

नवी देहली – केंद्र सरकारने ‘सीरम’ आणि ‘ऑक्सफोर्ड’ने बनवलेली ‘कोविशिल्ड’, तसेच ‘भारत बायोटेक’ आस्थापनाने बनवलेली ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती दिली आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (‘डीसीजीआय’ने) याविषयी म्हटले की, या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत.


‘कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते’, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याविषयी ‘डीसीजीआय’चे व्ही.जी. सोमानी यांना म्हटले की, आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही, जी नपुंसकत्व आणते. ‘लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येते’, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.