समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रजापती यांचे घर आणि कार्यालये यांवर ईडीच्या धाडी

३ सहस्र ३७९० कोटी रुपयांची अवैध संपत्ती सापडली

  • इतक्या कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमा करेपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना त्या वेळी कारवाई न करण्यासाठी लाच देण्यात आली होती, याचीही चौकशी झाली पाहिजे !
  • जर एका माजी मंत्र्याकडे इतकी अवैध संपत्ती असू शकते, तर देशातील अन्य भ्रष्ट आजी-माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे किती अवैध संपत्ती असेल, याची कल्पनाच करता येत नाही !
समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि अखिलेश यादव

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांचे घर आणि कार्यालय यांवर अंमलबजावणी संचालनालयाने घातलेल्या धाडीत त्यांच्याकडे ३ सहस्र ७९० कोटी रुपयांची अवैध संपत्ती सापडली आहे.

प्रजापती यांच्या वाहनचालकाच्या नावावरच २०० कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे यात उघड झाले. या कारवाईमध्ये अनेक कागदपत्रे, तसेच हवाला माध्यमातून फिरवण्यात आलेल्या पैशांच्या संदर्भातील माहिती मिळाली आहे.

 (सौजन्य : CAPITAL TV)

प्रजापती यांची मुले आणि जवळचे नातेवाईक यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही धाडी घालण्यात आल्या. यात अवैध खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्रे मिळाली आहेत. प्रजापती यांची मुंबई आणि पुणे येथेही संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे.