(म्हणे) ‘छळापासून वाचायचे असेल, तर हिंदु तरुणींना बहीण मानावे !’  

समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांचे ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यावरून मुसलमान तरुणांना आवाहन

  • धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते !
  • धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘लव्ह जिहाद’ हा एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी केले आहे.

१. हसन यांनी म्हटले आहे की, आता असा कायदा बनला आहे की, ज्यामध्ये बलपूर्वक छळ केला जाऊ शकतो. स्वतःला वाचवायचे असेल, तर कोणत्याही प्रलोभनामध्ये किंवा प्रेमाच्या चक्करमध्ये न पडता स्वतःचे जीवन वाचवावे.

 (सौजन्य : NMF News)

२. उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी अध्यादेश संमत केला आहे. यामध्ये धोका देऊन धर्मपरिवर्तन केले, तर १० वर्षांचा कारावास होऊ शकतो. तसेच २५ सहस्र रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.

३. एखाद्याला धर्मांतर करायचे असल्यास त्याला २ मास आधी जिल्हाधिकार्‍यांना सूचना द्यावी लागणार आहे.