राज्यातील गड-दुर्गांचे मूळ स्वरूपात संवर्धन करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

गड-दुर्ग यांच्या संवर्धनाचे काम करतांना आधुनिक पद्धतीने न करता त्यांच्या मूळ रूपात त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

Indian Navy Day 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण !

भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे !

Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवरायांच्या विजिगीषू वृत्तीचा जयघोष करत ‘भारतीय नौदल दिन’ साजरा करूया !

आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे नौदल दिनाची सिद्धता पूर्ण !

मालवण येथे नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय झाल्यानंतर गेले २ मास सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. नौदल दिन आणि ‘राजकोट’ येथील शिवपुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमांची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे !

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणारा नौदल दिनाचा सोहळा महाराष्ट्रासाठी भूषणावह ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !

Indian Navy Day 2023 : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

या कालावधीत शहर, तसेच अतीमहनीय व्यक्ती ये-जा करणारे रस्ते आणि परिसर येथील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मालवण पोलिसांचे आवाहन !

Indian Navy Day Reharsal : तारकर्ली (मालवण, सिंधुदुर्ग) येथे आजपासून नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम

नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे. या निमित्ताने भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे.

Sindhudurg Fort Foundation Day : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याच्या वर्धापदिनानिमित्त मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा

२५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे विधीवत् भूमीपूजन केले होते.

Save Forts : खर्डा (अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारे बांधकाम थांबवले !

गड-दुर्गांचे संवर्धन, रक्षण तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !