सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

सावंतवाडी शहरात आज दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.

येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

हुपरी (कोल्हापूर) शहरातील आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगराध्यक्षांची मागणी

जिल्ह्यातील हुपरी शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग किटची सुविधा आणि स्वॅब कलेक्शन केंद्र तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांनी केली आहे.

अकलूजजवळ अलगीकरणातील निवृत्त साहाय्यक फौजदाराचे घर चोरट्यांनी लुटले

अकलूजजवळील माळीनगर येथे कोरोनाबाधित सेवानिवृत्त साहाय्यक फौजदार आणि त्यांचे कुटुंबीय अलगीकरण कक्षात होते. या संधीचा अपलाभ घेऊन चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पळवले आहेत.