कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

मुरगांव – राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत. सासष्टी तालुक्यात ८, तिसवाडी तालुक्यात ४, डिचोली तालुक्यात ३, फोंडा तालुक्यात २, सत्तरी तालुक्यात २, बार्देश तालुक्यात ५ बळी गेले आहेत. मुरगाव तालुक्यात सध्या ७०० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मुरगाव तालुक्यात काही अल्प वयाच्या मुलांचेही कोरोनामुळे बळी गेले आहेत. मांगोर हिल भागात जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा वास्को शहरात दळणवळण बंदी लागू केली असती, तर मुरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नसता, अशी चर्चा सर्वत्र आहे.