सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी – सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी हा कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात आला आहे. श्री गणेशचतुर्थीचा सण साजरा करतांना भाविकांनी कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.