येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

पुणे – येरवडा स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाइकांकडून अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्याचे २ सहस्र आणि अस्थी परत देण्यासाठी १ सहस्र रुपये मागितले जात आहेत. महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा प्रकार सर्रास चालू असून या विभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र याकडे डोळेझाक केलेली आहे. दुःखात असलेल्या नातेवाइकांच्या मन:स्थितीचा अपलाभ घेतला जात आहे. असंवेदनशीलपणे काम करणार्‍या या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल आहेर पाटील यांनी केली आहे.