सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
सिंधुदुर्ग – श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.
सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नांदगाव, कासार्डे आणि कणकवली येथे पोलीस साहाय्य केंद्र चालू करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी, तसेच जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांतही पोलिसांची गस्त असणार आहे.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा ! – जिल्हाधिकार्यांचे आवाहन‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी गणेशोत्सव साधेपणाने आणि कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. बाजारपेठांमध्ये गर्दी करणे टाळावे. श्री गणेशमूर्ती आणतांना आणि विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढू नयेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने सहकार्य करावे’, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. |