कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कराड (सातारा) – कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे. सांडव्यावरून ९ सहस्र ३६० क्युसेक्स आणि वीजगृहातून १ सहस्र ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. पाण्याची पातळी वाढणार असल्याने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क रहाण्याची चेतावणी प्रशासनाने दिली आहे.