अकलूजजवळ अलगीकरणातील निवृत्त साहाय्यक फौजदाराचे घर चोरट्यांनी लुटले

कोरोनाच्या भयंकर संकटकाळातही चोर्‍या होणे, हे समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचेच द्योतक ! अशांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्या !

सोलापूर – अकलूजजवळील माळीनगर येथे कोरोनाबाधित सेवानिवृत्त साहाय्यक फौजदार आणि त्यांचे कुटुंबीय अलगीकरण कक्षात होते. या संधीचा अपलाभ घेऊन चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पळवले आहेत. चोरीला गेलेला एकूण ऐवज किती मूल्याचा होता ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवृत्त साहाय्यक फौजदारांच्या नातेवाइकाने याविषयी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

अकलूजमध्ये यापूर्वीही एका व्यापार्‍याचे कुटुंब अलगीकरण कक्षात असतांना त्याचे घर फोडण्यात आले होते, तसेच सोलापूर येथेही अलगीकरण कक्षात गेलेल्या ३ कुटुबांची घरे फोडण्यात आली होती.