सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १०३ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९९ आहे.

कणकवलीत भटक्या कुत्र्यांवर नगरपंचायतीची उपाययोजना

कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

उसगाव वडाकडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ठार

उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस यांचे जागीच निधन झाले.

वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील लोरे क्रमांक २, दुधमवाडी येथील लवू वसंत मांडवकर हे शेतात काम करत असतांना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २७ जून २०२० या दिवशी घडली होती.

अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या युवकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका युवकाला निवती पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सुवर्णा श्रीकांत जाधवर (वय ४८ वर्षे) यांचे १५ नोव्हेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, १ मुलगा, २ मुली, असा परिवार आहे. सनातन परिवार जाधवर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

मालवण येथे जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदर विभागाची कारवाई

१८ नोव्हेंबरला बंदर विभागाच्या पथकाने ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी राज्यशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगत अवैधपणे व्यवसाय करणार्‍या ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांवर कारवाई केली. या वेळी संतप्त व्यावसायिकांनी ‘कारवाई न थांबवल्यास समुद्रातच उपोषण करू’, अशी चेतावणी दिली

हुलजंती (जिल्हा सोलापूर) येथे महालिंगराया यात्रेच्या पालखी सोहळ्यात पोलिसांचा लाठीमार

हुलजंती येथे महालिंगराया यात्रेच्या वेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी पालख्यांसमवेतचे भाविक, तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकार्‍यांसह ७४ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार्‍यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !