कोल्‍हापूर महापालिकेच्‍या वतीने वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार !

देशाच्‍या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्‍या वीर सैनिकांच्‍या, तसेच महापालिकेच्‍या अग्‍नीशमनदलात सेवा बजावत असतांना हुतात्‍मा झालेल्‍या सैनिकांच्‍या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार प्रशासक कार्तिकेयन एस्. यांच्‍या हस्‍ते शाल, साडीचोळी, रोप आणि पुस्‍तक देऊन करण्‍यात आला.

विनाअनुमती झाडे तोडल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकाला दिली नोटीस !

कोंढवा परिसरात वाढलेली बांधकामे, सातत्‍याने येत असलेले बांधकाम प्रकल्‍प यांमुळे परिसरातील हरित क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बांधकामासाठी अनेक ठिकाणी विनाअनुमती झाडे तोडली जात आहेत.

रिंगरोडसाठी भूमीमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत स्वेच्छेने भूमी दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला !

रिंगरोडसाठी (बाह्य वळण रस्त्यासाठी) आवश्यक २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन अद्याप शेष आहे. त्यासाठी आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबदला देण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. ती पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.

मुख्य लेखापालांना अटक !

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अपहाराचे प्रकरण

जनावरांची अमानुष वाहतूक रोखण्यासाठी केलेले उपाय स्पष्ट करावेत !

मुंबई उच्च न्यायालयाचा परिवहन विभागाला आदेश

संस्थानकालीन आचरे गावच्या ‘गावपळणी’ला प्रारंभ

तालुक्यातील संस्थानकालीन आचरे गावच्या सर्वधर्मीय एकजुटीचे दर्शन घडवणार्‍या आणि प्रथा-परंपरा यांची जपणूक करणार्‍या आचरे गावाच्या गावपळणीला १५ डिसेंबरला प्रारंभ झाला.

सिंधुदुर्ग आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघड

शासकीय रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि येथे केल्या जाणार्‍या उपचारांवर जनता विश्वास ठेवून असते; मात्र आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

धर्माचरणामुळेच हिंदूंचे कुटुंब आणि राष्ट्र यांचे रक्षण शक्य ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

सांगवी काटी (तालुका तुळजापूर) येथील धर्मप्रेमींच्या पुढाकाराने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे यशस्वी आयोजन !

बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येला कारणीभूत असलेले पंतप्रधान महंमद युनूस शांतीचा ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त असणे हास्यास्पद ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.

दत्तजयंतीनिमित्त ‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !

पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. आश्रमात पालखीचे आगमन झाल्यावर धर्मदंड घेतलेल्या भक्तांच्या पायांवर जल अर्पण करण्यात आले आणि धर्मदंडाला कुंकू लावून त्याचे पूजन करण्यात आले, तसेच कलशपूजन करण्यात आले.