लाचप्रकरणी गुन्हा नोंद झालेले न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

जामीन आवेदनाविषयी साहाय्य आणि तो संमत करून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ग ३ धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

पुरुषार्थ जागृतीसाठी बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचलन !

‘गीता जयंती’चे औचित्य साधून बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. या वर्षी बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीसिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांच्या संख्येत वाढ, कार्यकाळही वाढवला !

मुंबईतील प्रभादेवी येथील स्वयंभू आणि प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांची संख्या ९ वरून १५ इतकी करण्याचा, तसेच विश्वस्त समितीचा कालावधी ३ ऐवजी ५ वर्षे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरी !

सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायननगर येथील दत्तभूमीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

भांडुप (पश्‍चिम) येथे धर्मांतराची पत्रके वाटणार्‍या ख्रिस्त्यांना हिंदुत्वनिष्ठाने रोखले !

ख्रिस्त्यांचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक आहे !

सानपाडा (नवी मुंबई) येथील ‘ऑर्केस्ट्रा बार’ विरोधातील स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

बारमुळे परिसरात असामाजिक कृत्य घडू शकणार असल्याने त्या विरोधात स्थानिक माजी नगरसेविका रूपाली भगत आणि वैजयंती भगत यांनी येथील प्रभागातील नागरिकांसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परवाना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे हरकती पत्राचे निवेदन दिले.

शासनाच्‍या विविध योजनांचे मिळणारे सानुग्रह अनुदान उंचगाव येथे मिळावे ! – ठाकरे पक्षाचे निवेदन

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्‍या योजनांद्वारे नागरिकांना सानुग्रह अनुदान दिले जाते. गांधीनगर, वळीवडे, उंचगाव, रुईकर कॉलनी यांसह अन्‍य ४ सहस्र लोकांचे अनुदान कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या शाखेत जमा होते.

कोल्‍हापूर येथे शौर्य संचलन उत्‍साहात !

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित शौर्य संचलन कोल्‍हापूर शहरात उत्‍साहात पार पडले.

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या वतीने वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार !

देशाच्‍या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्‍या वीर सैनिकांच्‍या, तसेच महापालिकेच्‍या अग्‍नीशमनदलात सेवा बजावत असतांना हुतात्‍मा झालेल्‍या सैनिकांच्‍या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार प्रशासक कार्तिकेयन एस्. यांच्‍या हस्‍ते शाल, साडीचोळी, रोप आणि पुस्‍तक देऊन करण्‍यात आला.

विनाअनुमती झाडे तोडल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकाला दिली नोटीस !

कोंढवा परिसरात वाढलेली बांधकामे, सातत्‍याने येत असलेले बांधकाम प्रकल्‍प यांमुळे परिसरातील हरित क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बांधकामासाठी अनेक ठिकाणी विनाअनुमती झाडे तोडली जात आहेत.