चला ! शौर्य, भक्ती आणि हिंदु राष्ट्र यांचा संकल्प करू रामनवमीला !!
हिंदु संस्कृतीचा मान वाढवू । रामाच्या आदर्शांनी जीवन घडवू । धर्मरक्षण अन् धर्माचरण यांवर उभ्या । हिंदु राष्ट्राचा उज्ज्वल विचार रुजवू ।।
हिंदु संस्कृतीचा मान वाढवू । रामाच्या आदर्शांनी जीवन घडवू । धर्मरक्षण अन् धर्माचरण यांवर उभ्या । हिंदु राष्ट्राचा उज्ज्वल विचार रुजवू ।।
श्री. जुगलकिशोर यांनी श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगून सर्वांना श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले. समारोपाच्या प्रसंगी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभामंडपात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत साजरा करण्यात आला.
‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’त रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. ‘श्रीराम जन्मला गं बाई…’ या जयघोषात धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तीमय झाला.
आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने एक अतिशय वेगळे चित्र आपल्यासमोर सादर करत आहे. हे चित्र फार वेगळे आणि जुने असून या चित्रामध्ये सीतेने मराठी पद्धतीची साडी नेसून पदर खोचलेला आहे.
श्रीसमर्थ रामदासस्वामी श्रीरामाच्या सगुण साकार रूपाचे वर्णन स्वतः राम होऊनच करत आहेत. राम रंगाने सावळा आहे. ‘जलदप्रभानिभ’ आहे. राजीव लोचन आहे आणि आता म्हणत आहेत श्रीराम ‘आजानुबाहु’ आहे.
अत्यंत विरक्त असलेल्या महातपस्वी वाल्मीकिऋषींना रामचंद्राचे चरित्र काव्यांतून गावे असे जे वाटले, ते त्यांच्या ठिकाणी एकवटलेल्या सद्गुण समुच्चयामुळेच !
रावणाला स्वतःचा पराभव झाल्याची चिंता नव्हती; परंतु ‘सीता माझ्याविषयी काय विचार करील ?’, असा विचार त्याच्या मनात आला. त्याच्या कामवासनेमुळे त्याचे वीर्य (पराक्रम) निघून गेले होते.
‘प्रभु श्रीरामाला एकाच रूपात बद्ध करता येत नाही. प्रभु श्रीरामाचे व्यक्तीमत्त्व इतके विशाल होते की, ते एकाच वेळी अनेक रूपांमध्ये प्रगट होऊन अनेक प्रकारच्या दैवी लीला करत होते. श्रीरामनवमीच्या औचित्याने आपण श्रीरामाच्या विविध दैवी रूपांचे भावस्मरण करूया.