गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ धर्मांधांसह एकूण ८ जणांना अटक

शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) – श्रीरामनवमी उत्सवानिमित्त सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न शेवगाव पोलिसांनी उधळला आहे. आंबेडकर चौकामध्ये पोलिसांनी २ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, ४ मॅगझिन, २ स्कॉर्पिओ गाड्या आणि ११ भ्रमणभाषसंच असा एकूण १३ लाख ३५ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी अंकुश धोत्रे, शेख जलील, सुलतान शेख, दीपक गायकवाड, मुक्तार सिकंदर, पापाभाई बागवान, सोहेल कुरेशी, आवेज शेख यांना अटक केली आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक आदिनाथ नाईक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे सण-उत्सव दहशतीखाली साजरे करावे लागत असतील, तर हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. अशांवर कायमस्वरूपी वचक बसवण्यासाठी पोलीस काही करणार का ? |