Bengal Ram Navami Alert : श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये तणाव

मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अर्धसैनिक दल तैनात

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये श्रीरामनवमीवरून तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने पोलिसांच्या सुट्ट्या ९ एप्रिलपर्यंत रहित केल्या आहेत. गेल्या वर्षी बंगालमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याने हा तणाव दिसून येत आहे. विशेषतः राज्यातील कोलकाता, मुर्शिदाबाद, हावडा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, सिलिगुडी, जलपाईगुडी, अलीपूरद्वार, कूचबिहार येथे अतिरिक्त पोलीस दल आणि धडक कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सर्व समुदायांना ‘अफवांकडे लक्ष देऊ नका’ असे आवाहन केले आहे.

१. दक्षिण बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुप्रतिम सरकार यांनी सांगितले की, श्रीरामनवमीच्या नावाखाली अशांतता पसरवण्याचा कट रचण्यात आल्याची आम्हाला गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे. (मोहरमची मिरवणूक, किंवा ईद यांच्या वेळी कधी कुणी आक्रमण करत नाही; मात्र हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे होतात, असे का ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले देतील का ? – संपादक) कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

२. कोलकात्याचे पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत कुणीही शस्त्रे बाळगू नयेत, असा आदेश प्रसारित केला आहे. (हिंदू कधीच शस्त्रे बाळगत नाहीत; मात्र जे नेहमीच शस्त्रे बाळगतात, त्यांच्यावर पोलीस कधी कारवाई करत नाहीत ! – संपादक)

३. उत्तर बंगालमधील एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, डोंगराळ जिल्ह्यांमध्ये अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे.

४. नुकतेच मालदा येथील मोथाबारी येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्याचा सराव करत असतांना तेथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना घटनास्थळी पोचू दिले नाही.

राज्यात श्रीरामनवमीच्या २ सहस्र मिरवणुका निघणार !

श्रीरामनवमीला राज्यात २ सहस्र मिरवणुका काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात ५ लाख लोक सहभागी होतील, तर दीड कोटी हिंदू त्या पहाण्यासाठी घराबाहेर पडतील, असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अफवांवर लक्ष ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. संवेदनशील भागात काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

नंदीग्राममध्ये बांधण्यात येणार भव्य श्रीराममंदिर !

आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये अयोध्येच्या धर्तीवर एक भव्य श्रीराममंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. श्रीरामनवमीला ते त्याची पायाभरणी करतील.

आक्रमण झाल्यास प्रत्युत्तर देऊ ! – भाजपची चेतावणी

‘जर श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे झाली, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. आम्ही प्रत्युत्तर देऊ, अशी चेतावणी भाजपने दिली आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमध्येच नाही, तर देशात कुठेही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून मशिदीच्या ठिकाणी आक्रमणे होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी मिरवणुकांच्या मार्गांवरील प्रत्येक मशिदीची झडती घ्यावी आणि तेथेच पोलीस तैनात करावेत, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !