धाटवाडी येथे एकही ख्रिस्ती नसतांना ख्रिस्ती धर्माचा चालू होता प्रचार !

दोडामार्ग – शहरातील धाटवाडी येथे ख्रिस्त्यांचे एकही घर नसतांना डिचोली, गोवा येथील काही महिला येथे ‘बायबल’ वाटून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासह धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होत्या. याविषयी हिंदूंना समजल्यावर त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने धर्मांतराचा हा प्रकार हाणून पाडला. त्यानंतर त्या महिलांना पोलिसांनी कह्यात घेतले.
धाटवाडी येथे एक मंडप उभारून तेथे हिंदु धर्मातील महिलांना बोलावून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सांगितले जात असल्याचे काही हिंदु युवकांना समजले. याविषयी खात्री झाल्यावर दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. त्यानंतर दोडामार्ग पोलीस हिंदु युवकांसमवेत धाटवाडी येथे आले, तेव्हा तेथे आलेल्या महिलांकडे बायबल आणि ख्रिस्ती धर्माविषयी प्रचार साहित्य सापडले. डिचोली, गोवा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या काही महिला येथे आल्या होत्या. या वाडीत ख्रिस्त्यांचे एकही घर नाही किंवा कुणी रहात नसतांना मंडप उभारून धर्मांतराविषयी प्रबोधन चालू होते. पोलिसांनी येथे लावलेला ध्वनीक्षेपक आणि अन्य साहित्य कह्यात घेतले. या घटनेमुळे येथील हिंदू संतप्त झाले असून त्यांनी याविषयी पालकमंत्री नितेश राणे यांना माहिती दिल्याचे समजते.
४ वर्षांपूर्वी दोडामार्गमध्ये एका घरात असा धर्मांतराचा प्रकार चालू होता. तेव्हाही हिंदूंनी हा प्रकार बंद पाडला होता. असे असतांना पुन्हा हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले. या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांकडून दहशतीच्या जोरावर, तर ख्रिस्त्यांकडून आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. हिंदू स्वत:मध्ये धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी स्वयंप्रेरित झाले नाहीत, तर लवकरच हा हिंदूबहुल देश ख्रिस्ती अथवा इस्लामी देश झालेला पहावा लागेल, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? |