बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंच्या रक्षणाची मागणी !

विश्व हिंदु परिषदेचे आंदोलन

विश्व हिंदु परिषदेचे आंदोलन

यवतमाळ, १९ एप्रिल (वार्ता.) – येथे बंगाल राज्यात हिंदूंना लक्ष्य करून घडवण्यात येत असलेल्या हिंसेच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ‘बंगाल राज्यशासन हिंदूंच्या हिंसा आणि त्यांना साहाय्य करण्याऐवजी मुसलमानांचे तुष्टीकरण करून हिंदूंप्रती भेदभाव करत असल्याने बंगाल येथे राष्ट्रपती शासन लावून हिंदूंचे रक्षण करावे’, अशी मागणी करण्यात आली.