आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणाकडून मंदिरातील हनुमान मूर्तीची तोडफोड

आरोपी मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय  

आझमगड (उत्तरप्रदेश) – सिंहपूर बाजारपेठेत पोलीस चौकीच्या मागे असलेल्या अमृत सरोवर तलावावर बांधलेल्या मंदिरात स्थापित श्री हनुमानाच्या मूर्तीचे गणेश गुप्ता या तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याने मंदिरात ठेवलेले त्रिशूळ काढून टाकले आणि विरोध करणार्‍या स्थानिक लोकांना हाकलून लावले. गुप्ता याने त्याला पकडण्यात आलेल्या पोलिसांवरही आक्रमण करण्याचा प्रयत्नही केला. मूर्तीच्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस निरीक्षक अनुराग कुमार म्हणाले की, प्रथमदर्शनी आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे दिसते; परंतु याचे अन्वेषण करावे लागणार आहे.  आरोपीचे कृत्य अक्षम्य आहे. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदु मनोरुग्ण हिंदूंच्याच मंदिरात जाऊन तोडफोड करतो, तर कथित मुसलमान मनोरुग्ण मशिदीत नाही, तर मंदिरात जाऊन तोडफोड करतो. यातून कोण खरा मनोरुग्ण आहे आणि कोण खोटा ?, हे वेगळे सांगायला नको !