सावंतवाडी शहरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात टेम्पोचालक गंभीर घायाळ
कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले.