अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावरून महिलेला खाडीत फेकणार्‍याला पोलीस कोठडी

शारीरिक सुखाला नकार दिल्यावरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या या घटनेतून समाजात वाढलेली वासनांधता आणि त्यातून निर्माण झालेली खूनशी वृत्ती दिसून येते ! ही स्थिती पालटण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याला आणि देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

देवगड – अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागावरून एका महिलेला तालुक्यातील वाडातर येथील पुलावरून खाडीत फेकणार्‍या तरुणाला न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

कणकवली येथे कामाला असणारी मूळच्या उत्तरप्रदेश येथील महिलेला २ मुले असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तुकाराम पांगम यांच्याशी तिचे २ वर्षे अनैतिक संबंध होते; मात्र आता त्या महिलेने तुकाराम यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या तुकाराम यांनी कणकवली येथून या महिलेला १० डिसेंबरला वाडातर येथे नेऊन तेथील पुलावरून खाडीत ढकलून दिले. पाण्यात पडलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने तेथील ग्रामस्थांनी तिला वाचवून पाण्याबाहेर काढले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तुकाराम पांगम यांना अटक केली.