आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काश्मीरमधील काँग्रेसच्या नेत्याला अटक

हा आहे काँग्रेसचा खरा तोंडवळा ! काश्मीरमधील आतंकवाद अद्याप का संपलेला नाही, याचे हे एक कारण आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! काश्मीरमधील राजकीय पक्षांकडून आतंकवाद्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे साहाय्य होतच असल्याने तेथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी अशा पक्षांवरही कारवाई झाली पाहिजे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.

१. ७ डिसेंबर या दिवशी काही आतंकवादी एका चारचाकी गाडीतून प्रवास करत होते. त्या वेळी भारतीय सैन्याने त्यांच्या वाहनाला बाबा खदर रामपुरा चौक येथे थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर आतंकवादी वाहन सोडून पळून गेले. त्या वेळी या गाडीत गौहर वानी हाही होता. त्याने स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची चौकशी करण्यात आल्यावर तो आतंकवाद्यांना मिळालेला असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

२. सूत्रांनी सांगितले की, वानी आतंकवाद्यांना आश्रय देण्यासह त्यांना वाहन उपलब्ध करून देत होता. त्या दिवशी तो हिजबुल मुजाहिदीनच्या आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य करत होता.