मठाच्या प्रमुखांना ठार मारण्याची धमकी
बंगालमध्ये आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना मठावर अतिक्रमण होणे आणि मठाधिपतींना धमक्या मिळणे यांवर चाप बसण्याची शक्यता अल्पच आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लावून जनतेचे आणि हिंदूंचे रक्षण करावे !
कोलकाता (बंगाल) – राज्यातील तारकेश्वर येथील ओंकारनाथ मठाच्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. रियल इस्टेट माफिया आणि बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून हे अतिक्रमण करण्यात आले आहे. या मठाचे प्रमुख त्रिवेणी स्वामी केशव रामानुज जीयूर महाराज यांनी विरोध करण्यास प्रारंभ केल्यावर त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
West Bengal: Land attached to Omkarnath Matha encroached in Tarakeshwar, builders threaten Matha chiefhttps://t.co/TJKZaSndC4
— OpIndia.com (@OpIndia_com) December 9, 2020
१. या मठाला लागून असलेली भूमी एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतली. या भूमीजवळून ये-जा करण्यासाठी मार्ग नसल्याने या व्यावसायिकाने मठाच्या दलदल असलेल्या भूमीवरून मार्ग बांधण्याचे काम चालू केले. याला मठाकडून विरोध झाला.
२. यापूर्वीही वर्ष २०१७ मध्ये मठाशेजारी बांधण्यात येणार्या इमारतीच्या वेळी मठाची भिंत पाडण्यात आली होती. या वेळी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचा खटला अद्याप चालू आहे.
३. आता स्वामी केशव रामानुज जीयूर महाराज यांना धमकी दिल्यानंतर त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न गुंडांकडून केला जात आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर विश्व हिंदु परिषदेने अन्य संघटनांच्या साहाय्याने मठाला साहाय्य करण्यास प्रारंभ केला आहे.