४ धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

दौंड (जिल्हा पुणे), ११ एप्रिल (वार्ता.) – येथील इदगा मैदान येथे ११ एप्रिलला रात्री १०.३० वाजता तन्वी उपाख्य तनु कुरेशी, वाजीद कुरेशी, बब्या कुरेशी, इस्माइल कुरेशी हे सर्व तनु कुरेशी याच्या गाडीमध्ये गोवंशियांना घेऊन आले आहेत आणि त्याच गाडीमध्ये रात्री त्यांची कत्तल करणार आहेत, अशी माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली. त्यानंतर अक्षय कांचन त्यांच्या सहकारी मित्रांसह दौंडकडे निघाले. पोलिसांच्या समवेत इदगा मैदान येथे आले असता सदर गाडीमध्ये तनु कुरेशी आणि वाजीद कुरेशी गायींची कत्तल करत होते, तसेच बब्या कुरेशी आणि इस्माइल कुरेशी हे गाडीच्या बाहेर उभे असतांना दिसले. पोलिसांची चाहुल लागताच ते सर्वजण पळून गेले. या वेळी ६० सहस्र रुपये किमतीच्या ३ मोठ्या जर्सी गायी आणि एका कत्तल केलेल्या गायीचे धड सापडले. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.’
संपादकीय भूमिका :गोवंश हत्या आणि गोतस्करी यांची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ? गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ? |