भंडारा येथे अवैध वाळू उत्खनन प्रकरण

भंडारा – जिल्ह्यातील तुमसर उपविभागातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर विभागीय महसूल आयुक्तांच्या चौकशीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्यांनी ९ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी अचानक धाडी घातल्या.
१. निकाळजे यांनी सरकारी कार्यालयात २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, तर तहसीलदार टिकले यांची नियुक्ती मार्च २०२४ मध्ये झाली होती. (इतक्या अल्प कालावधीत अधिकारी वाळू माफियांशी हातमिळवणी करून एवढे मोठे जाळे कसे उभे करतात ? याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक)
२. तुमसर तालुक्यातील वाळू तस्करी प्रकरणी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. फुके यांनी वाळू माफियांशी अधिकार्यांचे असलेले संबंध आणि त्याचे पुरावेही दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधत तातडीने कारवाईचे आदेश दिले.
संपादकीय भूमिका :
|