केरळमधील जैव तंत्रज्ञान संस्थेच्या परिसराला पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याचा निर्णय

राज्यातील राजीव गांधी सेंटर फॉर बॉयोटेक्नॉलॉजी संस्थेच्या परिसराला द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा राज्यातील साम्यवादी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांनी विरोध चालू केला आहे.

‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा.
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्‍यांना लुटणार्‍या दलालांना पाठिंबा !

हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !

वास्को येथे अनधिकृत भूमीत मदरसा उभारण्यास हिंदु संघटनांचा विरोध

भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

‘मराठा विकास प्राधिकरणा’च्या विरोधात कर्नाटकमध्ये कन्नड संघटनांचा राज्यव्यापी बंद

बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

मऊ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

येथे एका हिंदु युवतीला ‘राहुल’ नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शबाब नावाच्या तरुणावर आणि त्याच्या कुटुंबातील १४ जणांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.