‘मराठा विकास प्राधिकरणा’च्या विरोधात कर्नाटकमध्ये कन्नड संघटनांचा राज्यव्यापी बंद

बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकारने ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्या विरोधात राज्यातील कन्नड संघटनांनी ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला होता. या संघटनांकडून लोकांना बंद पाळण्याचे बलपूर्वक आवाहन करतांना पोलिसांनी अनेकांना कह्यात घेतले.

बेंगळुरू पोलिसांनी कन्नड संघटनांच्या १०० हून अधिक लोकांना कह्यात घेतले. बेंगळुरूच्या शिवाजीनगरमध्ये सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली.