भारत सरकारकडून मानचित्र हटवण्याचा आदेश
नवी देहली – ‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा आदेश दिला आहे. भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचे मानचित्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
After Twitter, #Wikipedia Shows #AksaiChin As A Part Of #China; Govt Asks To Remove The Wrong Maphttps://t.co/beXWVQZsYo
— ABP News (@ABPNews) December 3, 2020
एका ट्विटर वापरकर्त्याने या चुकीकडे लक्ष वेधत सरकारला कारवाई करण्याची विनंती केली. (हे अन्य कुणाला का सांगावे लागते ? शासकीय यंत्रणांचे याकडे लक्ष कसे नाही ? – संपादक) विकिपीडियाने ऐकले नाही, तर भारत सरकार कायदेशीर कारवाई करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ट्विटरने लडाखचा भाग चीनचा असल्याचे दर्शवल्यावर सरकारने कारवाई करण्याची चेतावणी दिल्यावर ट्विटरने क्षमा मागितली होती.