Ranchi Stones On Roofs : रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमी निमित्तच्या मिरवणुकीच्या मार्गावरील १० घरांच्या छतांवर आढळला दगडांचा साठा !

झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

ओडिशात पुलावरून बस कोसळल्याने ५ जण ठार, तर ४० जण घायाळ

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे

जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे  किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते !

असे असणार रामनवमीला श्रीरामलल्लांचे दर्शन !

उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत.

लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ! – अभिनेत्री मुमताज

अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच देशातील तरुण-तरुणींना विवाहाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याविषयी विधान केले होते. ‘हे संबंध सुधारण्याची आणि चाचणी करण्याची संधी देते ’, असे त्यांनी म्हटले होते.

श्रीनगर येथे झेलम नदीत नौका उलटून ६ जणांचा मृत्यू

श्रीनगर येथे बटवारा भागात झेलम नदीत १६ एप्रिलच्या सकाळी नौका उलटून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या नौकेतून ११ जण प्रवास करत होते.

देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.

निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

२ संशयित नवी मुंबईतून कह्यात, एकाची ओळख पटली !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २ संशयितांना नवी मुंबईतून कह्यात घेतले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित संस्थेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद

‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप