कर्नाटक : तुमकुरू रेल्वे स्थानकाला ‘सिद्धगंगा श्रीं’ यांचे नाव देण्याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून टाळाटाळ – केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा
तुमकूरच्या रेल्वे स्थानकाला सिद्धगंगा मठाचे डॉ. श्री शिवकुमार स्वामी (सिद्धगंगा श्री) यांचे नाव देण्यासाठी केंद्रशासनाने संमती देऊन ५ महिने झाले, तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केला.