पसार आतंकवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात येथे अटक

मुंबईतील वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण

वसई आणि विरार या शहरांतील अवैध गोमांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – अजिंक्य बगाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

महानगरपालिकेकडून गुन्हे नोंद असलेल्या विक्रेत्यांना परवाने दिलेच कसे गेले ? हेही आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे !

वाहनतळासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ! – महापालिका आयुक्त

मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील साक्षीदाराचे आतंकवादविरोधी पथकावरच आरोप ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करण्यासाठी होता साक्षीदारावर दबाव !

मुंबई महापालिकेचा ४५ सहस्र ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर !

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील ३ सहस्र ५०० उपाहारगृहांना कचर्‍याकरता वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे.

मुंबईत पेगासस प्रकरणावरून काँग्रेसच्या मोर्च्याच्या वेळी भाजपचे आंदोलन !

या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर २ फेब्रुवारीला सुनावणी करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत.

संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

पोलिसांच्या स्थानांतराची सूची मला अनिल परब द्यायचे ! – अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

‘जे नियमात बसत असेल, तेच करा नाही तर नाव बाहेर काढा’, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते’, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.