… तर १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ! – शासननियुक्त ‘टास्क फोर्स’

महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्‍या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्‍या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते.

घरोघरी जाऊन लसीकरण करू नका ! – केंद्र सरकार

घरोघरी जाऊन लसीकरण करू नका, असा सर्वांना सल्ला आहे, असे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी अनुमती मागितली होती.

मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांचा विषय मांडला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १७ जून या दिवशी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली. त्यानंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

शिवसेना आमदारांकडून कंत्राटदारावर कचरा फेकून संताप व्यक्त !

वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराने रस्त्याची स्वच्छता न केल्याने चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून संताप व्यक्त केला.

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना १५ जूनला अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पनवेल येथून अटक केली. 

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून मुंबईतील आणखी २ जणांना अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या ‘जिलेटिन’ कांड्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मालाड येथून आणखी २ जणांना अटक केली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची सूची राज्यपालांकडे !

७ मासांनंतरही नियुक्ती न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती विचारली. त्यानंतर प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीत वरील सूत्र स्पष्ट झाले.

खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण समर्थनीय नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना प्रमुख

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे प्रकरण

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण !

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याचे प्रकरण