प्रजेचा जराही विचार नसणार्‍या व्यवस्थेला ‘प्रजासत्ताक’ म्हणावे का ? – कु. नारायणी शहाणे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी पार पडले ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान !

लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतांना शाहरुख खान थुंकले ?

फुंकणे असो कि थुंकणे, हिंदूंच्या अंत्यविधीच्या वेळी स्वपंथातील कृती करण्याची काय आवश्यकता ? कुणी हिंदु मुसलमानांच्या अंत्यविधीच्या वेळी जाऊन गंगाजल शिंपडणे किंवा महामृत्यूंजय मंत्र म्हणणे अशा कृती करतात का ?

सोन्याची तस्करी करणार्‍या ५ प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक, ४ किलो सोने कह्यात

संयुक्त अरब अमिरातीतून मुंबईत अवैधरित्या सोने घेऊन येणार्‍या ५ प्रवाशांना मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. या कारवाईमध्ये ४ किलो सोने कह्यात घेण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य दीड कोटी रुपयांहून अधिक आहे.

एस्.टी.च्या शेकडो प्रशिक्षणार्थ्यांकडून नियुक्तीसाठी परिवहनमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २०१९ या वर्षी विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवून १ सहस्र ८०० जणांना प्रशिक्षण दिले होते; मात्र गेली २ वर्षे या प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले.

सनातनचे युवासाधक कु. हेरंब उदय धुरी यांच्या हस्ते पार पडले त्यांच्या शाळेत ध्वजारोहण !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऑनलाईन दाखवण्यात आला.

‘जिओ’ची भ्रमणभाष सेवा ठप्प, ग्राहक त्रस्त

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ५ फेब्रुवारीला दुपारपासून रिलायन्सच्या ‘जिओ’ भ्रमणभाष सेवेचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळे भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा वापरणार्‍या ग्राहकांची पुष्कळ असुविधा झाली.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर !

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता कर वृद्धी करणार !

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, मालमत्ता करात दर ३ वर्षांनी वृद्धी केली जाते; मात्र कोरोनामुळे गेली २ वर्षे मालमत्ता करात वृद्धी करण्यात आली नव्हती.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्यात आरोपपत्र प्रविष्ट

परमबीर सिंह यांच्यावर प्रविष्ट करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दोन पोलीस अधिकारी आणि सिंह यांचा मित्र संजय पुनमिया यांच्याविरोधात ३ फेब्रुवारी या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे ! कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !