
मुंबई – पेगासस चौकशी प्रकरणावरून आज मुंबईत काँग्रेसकडून भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्च्याला विरोध करण्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
Congress VS BJP : भाजपच्या कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा, गर्दीत पोलिसांना धक्काबुक्की
#Mumbai #Dadar #DadarRailwaystation #Pegasus #Congress #BJP pic.twitter.com/v1v3zHeAtf— ABP माझा (@abpmajhatv) February 2, 2022
या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. भाजप आमदार प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजप कार्यकर्ते मुंबईतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते. त्या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते येत असल्याचे समजताच भाजप कार्यकर्तेही त्यांच्या दिशेने गेले. पोलिसांनी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आणि भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनाही कह्यात घेतले.
कोल्हापूर ‘पासिंग’ वगळता राज्यातील सर्व वाहनांना प्रवेश कर लावण्याचा प्रस्ताव
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !