संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

पोलिसांच्या स्थानांतराची सूची मला अनिल परब द्यायचे ! – अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

‘जे नियमात बसत असेल, तेच करा नाही तर नाव बाहेर काढा’, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते’, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्पादन शुल्क खात्यातही स्थानांतराचा भ्रष्टाचार केला !

आनंद कुलकर्णी यांनी यासंबंधी माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०००-२००१ या काळात देशमुख उत्पादन शुल्क मंत्री होते. त्या वेळी त्यांनी राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या स्थानांतराची सूची आपल्याला पाठवली होती.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी ‘हिंदुस्थानी भाऊ’ उपाख्य विकास पाठक यांना पोलीस कोठडी

१० वी आणि १२ वीची परीक्षा रहित करण्यासाठी ३१ जानेवारी या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, धाराशिव, बीड येथील सहस्रो विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली.

मुंबई आणि ठाणे येथील रेल्वे प्रशासनाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या अतिक्रमणाच्या विरोधातील कारवाईला तात्पुरती स्थगिती !

इतकी वर्षे याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

२ जिल्हे वगळता राज्यात कोरोनाची तिसरी लाट शिखरावर ! – तज्ञांचे मत

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २९ जानेवारीला घोषित केले; परंतु राज्याच्या कोरोना कृती दलाने हे अमान्य केले आहे.

‘नाय वरन भात लोन्चा…’ चित्रपटाच्या विरोधातील याचिकेचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला !

आधीच समाजामध्ये बलात्काराच्या घटना वाढत असतांना अशा चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढण्याचा धोका आहे. अल्पवयीन मुलांना अश्लील आणि हिंसक कृत्ये करतांना दाखवणे, हे समाजासाठी हानीकारक आहे.

परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन !

‘हिंदुस्थानी भाऊ’ उपाख्य विकास पाठक यांनी दिलेल्या चिथावणीमुळे १० वी आणि १२ वी चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर !