ओटावा (कॅनडा) – कॅनडातील भारताच्या दूतावासातील उर्वरित मुत्सद्यांना कॅनडा सरकारने नोटीस पाठवली आहे. याद्वारे ते कॅनडाच्या नागरिकांचे कोणतीही हानी करणार नाहीत, असे बजावण्यात आले आहे, अशी माहिती कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी दिली. विशेष म्हणजे पंतप्रधान ट्रुडो यांनी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतांना भारतावर आरोप केल्याची स्वीकृती दिल्यानंतर जोली यांनी हे विधान केले आहे. खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येच्या अन्वेषणात कॅनडाने भारतीय राजदूत आणि इतर अधिकार्यांची नावे घेतल्याने भारताने आरोप फेटाळत कॅनडातून उच्चायुक्तांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला. यासह कॅनडाच्या ७ मुत्सद्दींना भारतातून हाकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर कॅनडाने वरील कृती केली.
Canada sends notice to the remaining diplomats of the Indian Embassy
Now India should also close the Indian Embassy in Canada and order the closure of Canada’s embassy in India !
Read More :https://t.co/BAynsq6ofP#MelanieJolie #CanadaIndiaRelations pic.twitter.com/IItfTe4DVR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 21, 2024
परराष्ट्रमंत्री जोली म्हणाल्या की, कॅनडाच्या राष्ट्रीय पोलीस दलाने भारतीय मुत्सद्दींचा कॅनडातील हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या आणि धमकावण्याशी संबंध आहे. आम्ही आमच्या इतिहासात असे कधीही पाहिले नाही. आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा प्रकार कॅनडाच्या भूमीवर होऊ शकत नाही. आपण युरोपात इतरत्र पाहिले आहे. रशियाने जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्ये असे केले आहे. आपण या सूत्रावर ठाम रहाण्याची आवश्यकता आहे. कॅनडाच्या नागरिकांचे जीव धोक्यात घालणार्या कोणत्याही मुत्सद्याला सरकार देशात स्थान देणार नाही.
संपादकीय भूमिकाआता भारतानेही कॅनडातील भारतीय दूतावास बंद करावा आणि कॅनडाचा भारतातील दूतावास बंद करण्याचा आदेश द्यावा ! |