शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमीषापोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – येथील एका व्यावसायिकाची शेअर बाजारात अल्प वेळेत चांगल्या परताव्याचे आमीष दाखवून ४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आदिश सोळंकी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात ‘केएस्एल् १५०७’ व्हॉट्सॲप ग्रुप आणि त्याचे ॲडमिन, अज्ञात भ्रमणभाषधारक, बँक खातेधारक यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

कोंढवा परिसरातील योती संत यांना ‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २०० टक्के नफा मिळवून देतो’, असे अनोळखी व्यक्तींनी सांगितले. ऑनलाईन धारिका पाठवून कोटक एन्.ई.ओ. ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि २०० टक्के नफा मिळत असल्याचे भासवून २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याविषयी गुन्हा नोंदवण्यात आला. (ऑनलाईन व्यवहारांविषयी नागरिकांनी सावध रहाण्यासह असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना काढणे आवश्यक ! – संपादक)