८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – कराचा भरणा करून बनावट जी.एस्.टी. इलेक्ट्रॉनिक देयकांच्या पावत्या बनवून वेगवेगळ्या आस्थापनांना पाठवल्या, असे दाखवून सरकारची ५६२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ८ आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाडिया महाविद्यालयासमोरील एका कार्यालयात १ जानेवारी २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. आरोपींनी बनावट आस्थापनाच्या नावाने राजू यादव याच्या वतीने करभरणा केला. बनावट जी.एस्.टी. इलेक्टॉनिक देयक पावत्या भ्रमणसंगणकात बनवून वेगवेगळ्या आस्थापनांना पाठवल्या. याद्वारे शासनाचा ५६२ कोटी रुपयांचा कर चुकवला. (अशा प्रकारे आर्थिक अपहार रोखण्यासाठी संबंधित विभाग काय उपाययोजना करणार ? – संपादक)
या अपहाराविषयी महंमद रियाझउद्दीन, अब्दुल सलाम ऊर्फ सलाम भाई, नैशाब मलीक उपाख्य नौशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई तनवीर, ओवीसीस, राजू यादव यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.