पिंपरी येथील खासगी वाहनांनी तिकीटांचे दर अधिक घेतल्यास कारवाई करू ! – उपप्रादेशिक परिवहन विभागाची चेतावणी

गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सवांच्या काळात शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी गर्दी करतात. त्या वेळी खासगी वाहनचालक, खासगी ट्रॅव्हल्स आस्थापने नागरिकांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत अधिक दराने (दुप्पट दराने) तिकीट विक्री करतात.

संकेतस्थळावर तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधा बंद ठेवून नागरिकांना मात्र तक्रार करण्याचे आवाहन !

गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्‍या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे.

प्रवाशांची लूटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

जनतेला लुटणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

गणेशोत्सवानिमित्त गावाला जाणार्‍या भाविकांना भरमसाठ दराने तिकीटविक्री होत असूनही राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष !

उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ?

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे परिवहन आयुक्तांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १८ मे या दिवशी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

अवाजवी तिकीटदर आकारणार्‍या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

अवाजवी तिकीटदर आकारल्या प्रकरणी ‘मोहन टॅ्रव्हल्स (घाडगे पाटील)’ या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या विरोधात वरळी येथील श्री. अभिषेक मुरुकटे यांनी १७ मे या दिवशी दादर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूटमार रोखण्यात परिवहन विभाग उदासीन !

परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?

एस्.टी.चे खरे मारेकरी कोण ?

सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !

दिवाळीमध्ये दुपटीहून अधिक तिकीटदर आकारून महाराष्ट्रात खासगी ‘ट्रॅव्हल्स’कडून प्रवाशांची आर्थिक लूट !

अशी लूट अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झाली असती, तर प्रशासनाने असाच निष्काळजीपणा दाखवला असता का ? सरकारने यात लक्ष घालून असे अपप्रकार चालू देणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे !