|
कोलकाता (बंगाल) – अवैधरित्या गाय आणि अन्य जनावरे यांची हत्या आणि मांसाची विक्री रोखण्यासाठीच्या नियमांची कठोरपणे कार्यवाही करा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने कोलकाता महानगरपालिकेला दिला. एका जनहित याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. यात म्हटले होते की, बकरी ईद आणि अन्य घटनांच्या वेळी गायीसहित अन्य जनावरांची हत्या केली जाते. त्याला प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यावर न्यायालयाने पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करून काय कृती करणार, हे सांगण्यास सांगितले आहे.