बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर अल्पवयीन मुलाकडून मुलीची हत्या !

पोर्न चित्रपट पाहिल्यावर मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची तरुणाकडून स्वीकृती

  • केंद्र सरकारने पॉर्न चित्रपटांवर बंदी घातली असतांनाही ते अद्यापही पहाता येत असतील, तर सरकारची बंदी फोल ठरली आहे, हेच लक्षात येते !
  • आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तिची हत्या करणार्‍या १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने येथील शेतात मुलीच्या ओढणीद्वारे तिचा गळा दाबून हत्या केली. भ्रमणभाष संचावर पॉर्न चित्रपट पाहिल्यावर या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.