‘कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली पुणे महापालिकेकडून मुसलमान धर्मियांसाठी हज हाऊस बांधण्याचा निर्णय
हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना नवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नाही का ? असे असतांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या ते लक्षात येत नाही का ?
पुणे, ४ मार्च – शहरातील कोंढवा खुर्द येथे सर्व्हे क्रमांक ४७ येथील ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागेवर ‘सिव्हीक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली पुणे महापालिकेकडून ४ कोटी रुपयांची तरतूद करून मुसलमान धर्मियांसाठी हज हाऊस बांधण्यात येत आहे. या बांधकामाला समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे. याविषयी एक पत्रच त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना २ मार्च या दिवशी दिले आहे.
‘वर्ष २००९ नंतर अवैधपणे कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम केले, तर महापालिका आयुक्त उत्तरदायी रहातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच हज हाऊसच्या निमित्ताने कोंढव्यामध्ये आतंकवाद्यांचे आश्रय स्थान निर्माण करून पुण्याच्या सुरक्षेला धोक्यात आणले आहे. त्यामुळे हज हाऊसच्या बांधकामाला कायमस्वरूपी स्थगिती द्यावी’, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
(पूर्ण स्क्रीन मध्ये व्हिडीओ पहावा)
या पत्रातील महत्त्वाची अन्य सूत्रे पुढीलप्रमाणे
१. ‘अॅमेनिटी स्पेस’मध्ये धार्मिक बांधकाम करण्यास मनाई आहे. या नियमातून पळवाट शोधून ‘कल्चरल सेंटर’ बांधण्याचा बहाणा करणे, हे महापालिका प्रशासनासाठी अशोभनीय आहे. पुणे महापालिकेने ‘कोणत्याही धार्मिक वास्तूसाठी सार्वजनिक निधी वापरू नये’, हा कायदासुद्धा धाब्यावर बसवण्यात आला आहे.
२. नागरिकांच्या हक्काचा कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ एका विशिष्ट धर्माच्या अनुयायांसाठी व्यय करणे, हा महापालिका अधिनियमाचा भंग आहे.
३. कोंढव्याची परिस्थिती गंभीर आहे. कोंढव्याला पुण्यातील नागरिक ‘मिनी पाकिस्तान’ संबोधतात, ही वस्तूस्थिती आहे. या ठिकाणी आतंकवाद्यांचा ‘स्लीपर सेल’ आहे, असा केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. मुंबईतील हज हाऊसमध्ये आतंकवादी सापडले होते, ही वस्तूस्थिती डोळेझाक करण्यासारखी नाही.
४. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी अवैधपणे मशिदींची बांधकामे चालू आहेत. याविषयी कारवाई झाली नाही, तर भविष्यकाळात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, तरी याविषयी शहर अभियंता श्री. वाघमारे यांना कारवाईचे आदेश द्यावेत.