विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

देशात चालू असलेल्या सामूहिक धर्मांतराच्या घटना थांबायला हव्यात. विवाहासाठी धर्मांतर करायला लावणे मान्य करता येणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारांनी केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याचे समर्थन केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्यास निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा पोलिसांनी रोखली 

कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली.

नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात.

देहलीमध्ये मांस विक्रेत्यांना मांस ‘हलाल’ कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, हे सांगणे बंधनकारक ठरणार !

अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे. हलाल पद्धतीमुळे मुसलमान समाजाची मांस विक्रीमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याने हिंदु खाटीक समाज बेरोजगार होत आहे आणि हिंदूंना वर्ज्य असतांनाही हलाल मांस खावे लागत आहे !

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

उत्तम अन्वेषणापेक्षा राजकीय वापर होण्याच्या कारणाने वारंवार चर्चेत आलेली केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या संदर्भातील काही तथ्ये !

‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेच्या (सीबीआयच्या) कार्यक्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच निवाडा आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने सीबीआयचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे.

शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

आंदोलन शेतकर्‍यांचे !

चर्चा करून मध्यम मार्ग काढता येईल, त्यात पालट करता येईल’, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे, तर शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, ‘हे कायदेच रहित करावे. आम्हाला यावर चर्चा करायची नाही.’ म्हणजे शेतकर्‍यांची टोकाची भूमिका आहे, तर सरकार ते मान्य करायला सिद्ध नाही. त्यामुळे हे आंदोलन चालू आहे.