बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी ! – हिंदु एकता आंदोलन

आंदोलनाच्या प्रसंगी बोलतांना  श्री. नितीन शिंदे आणि अन्य

मिरज, १४ डिसेंबर (वार्ता.) – सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी. बांगलादेशाला जी रसद (अन्नपुरवठा) पुरवली जाते, ती भारत सरकारने बंद करावी, तसेच बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी, अशा मागण्या हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केल्या. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी महाराणा प्रतापचौक येथे आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी सर्वश्री दत्ता भोकरे, संजय जाधव, विनायक माईणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु एकता मिरज तालुकाध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश भोसले, प्रमोद धुळूबुळू, आकाश जाधव, निताई पददास, अनंत कृष्णदास, राजू शिंदे यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.