अक्कलकोट – ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’च्या पाठपुराव्यामुळे गोवा परिवहन महामंडळाकडून गोवा-अक्कलकोट या नवीन बससेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही बस प्रतिदिन अक्कलकोट येथून सायंकाळी ६.१५ ला सुटेल, रात्री ७ वाजता सोलापूर आणि वास्को येथे दुसर्या दिवशी सकाळी ७.३० ला पोचेल, तर वास्को येथून प्रतिदिन रात्री ७ वाजता सुटेल, रात्री ८ वाजता पणजी आणि अक्कलकोट येथे दुसर्या दिवशी सकाळी ७.३० ला पोचेल. ही बस पणजी, पत्रादेवी, बांदा, म्हापसा, कुडाळ, कणकवली, कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर मार्गे सोलापूर अक्कलकोटला पोचणार आहे. या बससेवेसाठी ८८० रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे. या बससेवेमुळे स्वामीभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रारंभी पूजन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गोवा राज्य परिवहन महामंडळ (कदंबा) ट्रान्सपोर्टचे साहाय्यक वाहतूक अधिकारी सुहेश सावंत, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, उपाध्यक्ष अभय खोबरे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी, चालक-वाहक यांचा सत्कार न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.