B’desh Chinmoy Prabhu Bail Issue : चिन्मय प्रभु यांच्या जामीनासाठी स्थानिक अधिवक्त्यांना आणण्याचा न्यायालयाचा आदेश !

अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांनी घेतलेले वकीलपत्र नाकारले !

स्थानिक अधिवक्ता घेण्याचे सांगत बांगलादेशातील चितगाव सत्र न्यायालयाने चिन्मय प्रभु यांना जामीन पुन्हा नाकारला !

चितगाव (बांगलादेश) : बांगलादेशातील चितगाव येथील मेट्रोपॉलिटन सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महंमद सैफुल इस्लाम यांनी इस्कॉनचे सदस्य चिन्मय प्रभु यांच्या प्रकरणात १२ डिसेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांना या खटल्यात चितगाव येथील स्थानिक अधिवक्ता शोधण्यास सांगितले. यानंतर अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांनी स्थानिक अधिवक्ता सुमित आचार्य यांची नियुक्ती केली. यापूर्वी न्यायालयाने अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांच्याकडे प्रभु यांचे वकीलपत्र नसल्याचे सांगत चैतन्य प्रभु यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष

अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष यांनी सांगितले की,

११ डिसेंबर या दिवशी न्यायालयाने माझे म्हणणे ऐकून घेतले नाही; कारण माझ्याकडे चैतन्य प्रभु यांचे वकीलपत्र नव्हते. नंतर मला ते मिळाले. चिन्मय प्रभु यांनी कारागृहातून जामीनासाठी अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने मला स्थानिक अधिवक्त्यांना समवेत घेण्यास सांगितले. त्यानुसार मी अधिवक्ता सुमित आचार्य यांना समवेत घेतले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील न्यायालयेही हिंदुद्वेषी असून ती हिंदूंचा छळ करत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येत आहे. याविरोधात भारतातील लोकशाहीप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !